व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सातारा पालिकेच्या 25 प्रभागांसाठीची आरक्षण सोडत जाहीर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड यांसह 7 नगरपालिकांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम अंतिम झाल्यानंतर आज होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार आज सातारा पालिकेतील 25 प्रभागांसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढण्यात आली. यावेळी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शाळकरी मुलींच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. आज करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनंतर आता याबाबत नागरिकांना हरकत घ्यायची असल्यास त्यांच्यासाठी 15 जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या ‘वेबसाईट’वर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सूचना आणि हरकती 21 जूनपर्यंत प्रविष्ट करायच्या आहेत.

29 जूनपर्यंत अधिसूचना अंतिम करून त्यास मान्यता दिली जाणार असून मान्यता मिळाल्यानंतर सदस्य पदाच्या आरक्षणाची अंतिम माहिती 1 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या ‘वेबसाईट’वर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निवडणूक आयोगाने स्पष्ट करण्यात आले. सातारासह कराड, रहिमतपूर, म्हसवड, वाई, महाबळेश्वर, फलटण, पाचगणी आणि मेढा या नगरपालिकांचा आरक्षण सोडत कार्यक्रम आज पार पडला.

अशी आहे प्रभागनिहायक आरक्षण सोडत –

प्रभाग क्रमांक 1
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक 3
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक 4
अ – अनुसूचित जाती (महिला)
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5
अ- सर्वसाधारण (महिला)
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6
अ – सर्वसाधारण (महिला)
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7
अ – सर्वसाधारण (महिला)
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक 9
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13
अ – अनुसूचित जाती (महिला)
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15
अ – अनुसूचित जाती (महिला)
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 17
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 18
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 19
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 20
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 21
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 22
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 23
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 24
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 25
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण