माण तालुक्यातील बिदाल येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

माण तालुक्यातील बिदाल येथे कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्यायाधीश दहीवडी न्यायालयाचे अमरसिह मोहने उपस्थित होते .

बिदाल गाव शांत संयमी व सुशिक्षीत असलेने खर तर या गावात अशा शिबिराची आवश्यकता नाही. परंतु कायदयाची माहीती व्हावी. नागरिकांचा वेळ वाचावा महीलांना त्यांच्या हक्क अधिकाराची माहीती व्हावी, म्हणुन सदर शिबीराचे आयोजन बिदालमधे केले. नागरीकांनी कमीत कमी वेळा कोर्टात यावे म्हणुन तडजोड ; महीला विषयक कायदे ; जमिनीविषयक दावे यांसंदर्भातील माहीती दिली.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अपर्णा भोसले, शिवाभाऊ जगदाळे, सतिश जगदाळे, बिदाल गावच्या सरपंच गौरी जगदाळे, उपसरपंच सविता कुलाळ, सोमनाथ भोसले, ग्रामपंचायत सदस्य अशोक जगदाळे, उमेश जगदाळे, चंद्रकात ढोक, देवराम जाधव, आबा पाटील, बापुराव जगदाळे, सुरेश जगदाळे, किशोर इंगवले व अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचतगट प्रतिनीधी उपस्थित होते.

 

Leave a Comment