Tuesday, February 7, 2023

कोयनानगरला बिबट्या : नाईट पेट्रोलिंगला पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर बिबट्या

- Advertisement -

पाटण | कोयनानगर -नवजा येथे नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना कोयना नवजा रस्त्यावर गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बिबटयाचे दर्शन झाले. कोयनानगरचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांच्या मोबाईलमध्ये या बिबट्याच्या हालचाली कैद करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर हा नेहमीच पहायला मिळत असतो. कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत वन्य प्राण्यासाठी पोषक असे वातावरण आहे. तसेच वनविभागाकडून या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या भागात वन्य प्राण्याचे वास्तव्य दिवसेंन दिवस वाढत आहे.

- Advertisement -

कोयनानगर परिसरातसह पाटण व कराड तालुक्यात बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. अनेकदा या भागात बिबट्याचा वावर असल्याचे पहायला मिळतो. काल गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कोयनानगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना नवजाकडे जाताना पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांना एका वळणावर झाडाजवळ हालचाल दिसल्याने त्यांनी गाडी एका जागेवर थांबविली होती. त्यानंतर त्यांनी तेथे बिबट्या असल्याची खात्री झाल्यानंतर आपल्या स्वतः च्या मोबाईलमध्ये बिबट्याच्या हालचाली कैद केलेल्या आहेत.