सातारा शहरा जवळील शाहूनगरमध्ये भरवस्तीत बिबट्या घुसला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहराजवळील शाहूनगर येथे भरवस्तीत बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे बिबट्या भरवस्तीत भरदुपारी घुसल्याने नागरिकांची पळापळ होऊ लागली. शाहूनगरमध्ये बिबट्या आल्याची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

सातारा शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शाहूनगर परिसरात बिबट्या भरदुपारी 2.30 वाजता शिरल्याची बातमी समजताच लोकांनी शाहूनगर कडे बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची गर्दी होत होती. तर स्थानिकांच्यात बिबट्या घुसल्याने घबराट पाहायला मिळाली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/508092700503123

शाहूनगर मध्ये बिबट्या आल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिबट्या असलेल्या ठिकाणी कोणीही नागरिक जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे गिफ्ट मानवी वस्तीत असल्याने लोकांनी घराबाहेर पडू नये असे, आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहेत.

Leave a Comment