पुणे | पुण्यातील अविनाश भोसले हे नाव पुणेकर तसेच महाराष्ट्राच्या लोकांना चांगलेच माहिती आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर काही काळ रिक्षा चालवून, नंतर पुण्यातील रिअल इस्टेट किंग असा प्रवास पार केलेले अविनाश भोसले यांच्या पुण्यातील ABIL हाऊस या कार्यालयावर इडीने कागदपत्रे तपासणीसाठी छापा टाकला आहे. ही कारवाई फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी केली आहे. विदेशी चलन प्रकरणातही गेल्या काही दिवसापासून अविनाश भोसले यांची चौकशी होत आहे.
आयबीच्या परवानगीशिवाय विदेशी बँकेतील खात्यावर पाचशे कोटी कसे जमा झाले. या संशयामुळे इडीच्या अधिकाऱ्यांकडून अविनाश भोसले यांच्या विद्यापीठ रोड वरील ABIL हाऊस या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यापूर्वीही नोव्हेंबरमध्ये अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. डीडीने त्यावेळी भोसले यांना मुंबईमध्ये बोलवून तब्बल दहा तास चौकशी केली होती.
रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग! असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या अबिल ग्रुपचे ते मालक आहेत. अहमदनगर येथील संगमनेरमधून ते कामाच्या शोधासाठी पुण्यामध्ये आले. त्यानंतर त्यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. काही दिवसानंतर ते रिक्षा भाड्याने देऊ लागले. त्यासोबतच त्यांचा बांधकाम व्यवसायिक आणि शासकीय ठेकेदारांची संपर्क घेऊन त्यांनी रस्त्याचे काम घेणे सुरू केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील रिअल इस्टेट किंग असा प्रवास काही वर्षातच पूर्ण केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’