LIC Bima Sakhi Yojana : महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार; LIC ची भन्नाट योजना

LIC Bima Sakhi Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LIC Bima Sakhi Yojana । देशभरातील महिलांना आर्थिक लाभ व्हावा, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होऊन महिला स्वावलंबी बनाव्या यासाठी सरकार ननेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना यांसारख्या अशाच बऱ्याच योजना आहेत ज्यामुळे महिलांचे जीवनमान उंचावलं आहे. आता भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने सुद्धा महिलांसाठी खास योजना आणली आहे. ‘बिमा सखी योजना’ असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि ग्रामीण भारतात विमा सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने LIC ने ही योजना सुरु केली आहे. आज आपण या योजनेची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

मा सखी योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना एलआयसीकडून प्रशिक्षण दिले जाते आणि विमा एजंट म्हणून काम दिले जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत निवडलेल्या महिलांना ३ वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या वर्षी मासिक स्टायपेंड म्हणून ७,००० रुपये, दुसऱ्या वर्षी ६,००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५,००० रुपये दिले जातील. अशा प्रकारे, त्यांना तीन वर्षांत एकूण २ लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळेल.

काय आहे पात्रता? LIC Bima Sakhi Yojana

महिलांचे वय १८ ते ७० वर्षे असावे
महिला कमीत कमी १० वी पास असावी

पुढील तीन वर्षांत २ लाख विमा सखींची भरती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. एलआयसी विमा सखी (LIC Bima Sakhi Yojana) योजनेअंतर्गत, महिलांना विमा पॉलिसी विकायच्या असतात. त्यानुसार त्यांना कमिशन देखील दिले जाते.

महत्वाची कागदपत्रे-

२पासपोर्ट आकाराचे फोटो,
वयाचा पुरावा,
पत्त्याचा पुरावा
दहावीचे प्रमाणपत्र
बँक खात्याचा तपशील

अर्ज कसा करावा?

‘विमा सखी योजने’साठी (LIC Bima Sakhi Yojana) अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल किंवा ऑफलाईन अर्जासाठी तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागेल.