Monday, January 30, 2023

LIC Policy: तुम्हाला दरमहा मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागेल प्रीमियम,अशाप्रकारे घ्या लाभ

- Advertisement -

नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी, भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन (LIC) ने आपली अतिशय लोकप्रिय विमा पॉलिसी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) बंद केली होती, परंतु आता पुन्हा एकदा ती सुरू केली जात आहे. य एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच हप्ता दिल्यानंतर आयुष्यभर पेन्शन घेण्याची संधी मिळते.

जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही
जीवन अक्षय पॉलिसी एक प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अ‍ॅन्युइटी योजना आहे. त्यात किमान 1,00,000 रुपये गुंतवून ही पॉलिसी सुरू करता येते. या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

- Advertisement -

या पॉलिसीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने कमीतकमी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना वर्षाकाठी 12,000 रुपये पेन्शन मिळेल. म्हणजेच दर वर्षी 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर 12,000 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही कारण पॉलिसीधारक त्याच्या इच्छेनुसार त्यात गुंतवणूक करू शकतो. पेन्शनची रक्कम गुंतविलेल्या रकमेवर अवलंबून असते.

पात्रता काय आहे?
पात्रतेबद्दल बोलयचे झाल्यास लोकं ही पॉलिसी 35 वर्ष ते 85 वर्षांपर्यंत घेऊ शकतात. या व्यतिरिक्त अपंग लोकही या पॉलिसीचा फायदा घेऊ शकतात. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे निवृत्तीवेतनाची रक्कम कशी मिळवायची, यासाठी 10 पर्यायदेखील दिले आहेत.

तुम्हाला दरमहा 36 हजार रुपये पेन्शन कसे मिळेल?
जीवन अक्षय पॉलिसीच्या Annuity payable for life at a uniform rate चा पर्याय निवडून, आपण या पॉलिसीमध्ये एकरकमी गुंतवणूक करून दरमहा 36 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. उदाहरणार्थ, जर 45 वर्षांच्या व्यक्तीने ही योजना निवडली असेल आणि 70,00,000 रुपयांच्या सम एश्योर्डची निवड केली असेल तर त्याला 71,26,000 रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. या गुंतवणूकीनंतर त्याला महिन्याला 36,429 रुपये पेन्शन मिळेल. मात्र, मृत्यूनंतर ही पेन्शन थांबेल. एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये अशा अनेक योजना आहेत.