आनंदी राहण्यासाठी या पाच गोष्टी दररोज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Health| समाधानी राहणं हाच खरा आनंदी आयुष्याचा मूलमंत्र आहे, असं अनेक जण सांगतात. एखाद्या झालेल्या अथवा होणाऱ्या घटनेची निष्कारण काळजी, चिंता केल्यामुळे आपला मूड बिघडतो आणि विनाकारण आपण निराश होतो. याचा परिणाम आपल्या दिवसाच्या कामकाजावर तर होतोच, शिवाय सभोवतालच्या माणसांनाही आपण नकारात्मकतेची लागण करतो.

आनंदी राहण्यासाठी पुढील पाच गोष्टी तुम्ही रोज ध्यानात ठेवल्यात, तर तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी मदत होऊ शकेल.

१. एखादी गोष्ट ‘चांगली’ किंवा ‘वाईट’ असा शिक्का नको
एखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट असं शिक्कामोर्तब आपण लगेच करुन टाकतो. मात्र आधी ती गोष्ट नीट जाणून घ्या. चांगला-वाईट हे शब्द निरर्थक आहेत. कुठल्याही टोकाची भूमिका घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या

२. बदल हा क्रमप्राप्त आहे, त्याला पर्याय नाही –
या जगात कुठली गोष्ट कायम असेल तर ती म्हणजे बदल. तुम्ही दुःखात असाल, तर हे दुःख दूर होईल आणि आनंद येईल. त्याचप्रमाणे आनंदावर काही काळासाठी दुःखाचं ग्रहण लागेलच. आपल्या आयुष्यात बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल होणारच हे स्वीकारलं की पुढे काहीच कठीण नाही.

३. कुठल्याच गोष्टीवर तुमचं पूर्णपणे नियंत्रण नसतं –
आपल्या आयुष्याचे आपणच शिल्पकार असतो. यात तथ्य असलं तरी आपल्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असेलच, असं नाही. त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडणं साहजिक आहे. मात्र त्यातही समाधान मानलं तर तुमचा दिवस आनंदात जाईल.

४. इतरांची असहिष्णू वागणूक सहन करा –
आपण इतरांशी कसे वागतो, हे आपल्या हातात असतं, मात्र इतरांच्या वागणुकीवर आपलं नियंत्रण नसतं. संतापाच्या भरात एखाद्याचा उद्रेक होऊ शकतो, मात्र त्या वागणुकीचा मनस्ताप करुन घेण्यापेक्षा फरगिव्ह अँड फरगेट, म्हणजेच क्षमा करा आणि विसरुन जा हा मंत्र लक्षात ठेवला तर आपल्याला होणारा त्रास कमी होईल.

५. भावनांचा स्वीकार करा –
आपल्या प्रत्येक भावनेचा स्वीकार करायला हवा. ज्याप्रमाणे चांगल्या भावनांना आपण स्वीकारतो, त्याप्रमाणे दुःख, निराशा यांचाही आदर करायला हवा. वाईट वाटणं, यात काहीच गैर नाही. प्रत्येक भावना एकदा अनुभवायला हवी. त्यातूनच तुम्ही कणखर व्हाल.

Leave a Comment