महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

होऊदे चर्चा | विभावरी विजया नकाते

“नमस्कार , मी ज्ञानदा कदम…
ABP माझा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे…!! ” अवघ्या महाराष्ट्राची दररोजची सकाळ या आवाजाने गोड होते. ब्रेकफास्ट करत असताना टी.व्हीवर आपल्या नेहमीच्या स्टाईलने कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या ज्ञानदा कदमकडून बातम्या ऐकूनच अनेकांच्या बिझी दिवसाची सुरुवात होते. ” मॉर्निंग ब्रेकफास्ट ” या डेली शोच्या माध्यमातून न्यूज बुलेटिन घेऊन ज्ञानदा गेली कित्येक वर्षे आपल्या भेटीला येत आहे. एबीपी माझासारख्या मराठी इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील एका महत्वाच्या news चॅनलची मुख्य अँकर म्हणून ज्ञानदा कदम काम करत आहे. 13 वर्षांपूर्वी रिपोर्टर म्हणून रुजू झालेल्या ज्ञानदाने आज चीफ अँकर पदापर्यंतचा पल्ला गाठलाय. हा प्रवास करत असताना तिने प्रेक्षकांच्या मनात सुद्धा एक हक्काचं स्थान निर्माण केलंय. आपली स्वतःची स्टाईल आणि बोलण्यातला कॉन्फिडन्स या जोरावर ज्ञानदाने तिचं वेगळं स्थान इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात स्थापित केलंय. याचीच प्रचिती काही दिवसांपासून नेटकऱ्यांनी सुरू केलेल्या “#काय सांगशील ज्ञानदा ?” या हॅशटॅगवरून येतीय. kay sangshil dnyanada memes

करा जयजयकार, करा व्हायरल – फेसबुक, व्हाट्सअप स्टेट्स सगळीकडेच सध्या ज्ञानदा कदमचाच बोलबाला आहे. कोरोना आजारापासून वाचण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन काही सांगोत, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कितीही चर्चा घेवोत, आम्ही ज्ञानदा सांगेल तेच ऐकणार इथपर्यंत स्पष्ट व्यक्त होण्याची लोकांची मजल गेलीय. अनेक memes मधून ज्ञानदा झळकतेय. हे सारे memes, jokes व्हिडियोज प्रचंड व्हायरल होतानाही दिसतायत. खूप साऱ्या likes, comments आणि shares यामुळे ज्ञानदा कदम सध्या सोशल मीडियावर ट्रेंण्डिंग आहे. एवढंच कशाला, बुधवारी ज्ञानदाने स्वतः “काय सांगशील ज्ञानदा?” हे टायटल स्क्रीनवर घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना आवाहन केलं. kay sangshil dnyanada memes

प्रेक्षकांकडून विचारल्या जात असलेल्या प्रश्नाला तिच्या नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्याने उत्तरही दिलं. सध्या कोरोनामुळे घरीच बसून असलेल्या आपल्या फॅन्सनी व्यक्त केलेलं हे प्रेमच आहे असं समजून हे सारे memes, jokes अतिशय खिलाडूवृत्तीने स्वीकारून ज्ञानदाने आपुलकीने प्रेक्षकांशी संवाद साधला. “जगभरात पसरलेल्या कोरोना या महाभयंकर संकटाचे गांभीर्य ओळखून तुम्ही प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या हेच तुमची ज्ञानदा तुम्हाला सांगतीय.” abp माझा वरून ज्ञानदाने नेटकऱ्यांच्या प्रश्नाला दिलेलं हे उत्तर पाहून पुन्हा अनेक प्रेक्षक तिच्या स्टाईलचे फॅन बनले असणारेत यात वाद नाही. kay sangshil dnyanada memes

अखेर ज्ञानदाने उत्तर दिलेच ! पहा व्हिडियो

Kay Sangshil Dnyanada | नेटकऱ्यांच्या प्रश्नाला ज्ञानदाचं उत्तर; पाहा काय सांगतेय ज्ञानदा

याला प्रवास ऐसे नाव – “रिपोर्टर ते अँकर” असा २००७ पासूनचा तिचा abp माझावरचा प्रवास इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणींसाठी प्रोत्साहन देणारा आहे. २००७ मध्ये abp माझा सारख्या त्या वेळच्या नव्या news चॅनलमध्ये रुजू होत असताना सुरुवातीला एज्युकेशन फिल्डमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी ज्ञानदाने वर्षभर व्यवस्थित सांभाळली. बातम्या कश्या शोधायच्या ? कॅमेरा कसा हँडल करायचा ? स्टोरी कशी बनवायची ? फिल्डवर शूट कसं करायचं ? स्टोरीचं scripting, editing या सगळ्याच गोष्टी शिकत वर्षभरातच रिपोर्टिंगच्या कामात तिचा जम बसला. याच दरम्यान अँकरिंगची संधीही तिच्याकडे चालून आली. सुरुवातीला फक्त रविवारच्या एका कार्यक्रमाचं अँकरिंग करणाऱ्या ज्ञानदाला आज कित्येक तास अगदी कॉन्फिडन्टली न्युज रूम सांभाळत असताना आपण पाहतो. रिपोर्टिंग की अँकरिंग यापैकी एक क्षेत्र निवडण्याची वेळ आल्यावर तिने अँकरिंगचा पर्याय निवडला. तेव्हा पासून पूर्णवेळ फक्त अँकरिंगचंच काम तिने सुरू केलं. या क्षेत्रात काम करत असताना येणारी आव्हानं आणि त्यांना सामोरं जाण्याचं तंत्रही तिने या काळामध्ये अवगत केलं. kay sangshil dnyanada memes

आमच्या पिढीचा विचार करता सह्याद्री वाहिनीवर ज्योती आंबेकर, शिबानी जोशी यांनी तर डीडी वाहिनीवर नीलम शर्मा यांनी २००० ते २००७ पर्यंतचा, आणि त्यानंतरचाही काही काळ वृत्तनिवेदक म्हणून गाजवला होता. बातम्या ऐकाव्या तर यांनी दिलेल्याच ही फीलिंग त्यावेळी शालेय जीवनात असतानासुद्धा यायची. १५ मिनिटांची बातमीपत्र ऐकताना जाम भारी वाटायचं. महत्त्वाच्या ८-१० बातम्या बघून खुश व्हायचा तो काळ होता. त्यानंतर २४ तास बातम्या देणारी वाहिनी आली आणि काही काळ बातम्यांमधील मजासुद्धा निघून गेली.

फिर, फिर क्या हुआ..? – Abp माझामध्ये रुजू होण्याअगोदर काही महिने आकाशवाणीसाठी आणि प्रिंट मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव ज्ञानदापाशी होता. अनुभवांमधून घडत गेलेल्या ज्ञानदाचं सहज आणि हटके स्टाईलने अँकरिंग लोकांना बातम्या पाहायला प्रवृत्त करतं. न्युज बुलेटिनसारखा चॅलेंजिंग शो ज्ञानदा कोणतंही दडपण न घेता हसतमुखाने पार पाडते. मुद्देसूद प्रश्न विचारुन अनेक विचारवंतांसोबत गंभीर विषयांवरची चर्चासत्रे ज्ञानदाने संयमाने हाताळली आहेत. ‘माझा कट्टा’ सारख्या शोमध्ये अगदी मोजक्याच शब्दात प्रेक्षकांना मुलाखतीशी जोडून ठेवणारा दुवा ती बनते. विभिन्न क्षेत्रातील कित्येक दिग्गजांच्या मुलाखती घेताना तिची देहबोली कमालीची आत्मविश्वासपूर्ण वाटते. बातमीचं गांभीर्य ओळखून, स्वतःच्या बोलण्याच्या शैलीत आवश्यक ते बदल करून अनेक ब्रेकिंग न्यूज ती आपल्यापर्यंत मागील दहा वर्ष पोहचवत आली आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम घेऊन ज्ञानदा मराठी प्रेक्षकांसमोर आली आहे. “मराठी बिग बॉस” या शोमधून महिला उद्योजकांच्या घेतलेल्या मुलाखती, महापालिका निवडणुकांच्या दरम्यान केलेला “रणसंग्राम रणरागिनींचा” हा कार्यक्रम तिच्यातील वेगळ्या कौशल्यांची चुणूक दाखवतात. हुंड्याला विरोध, आरक्षण, माझी शाळा, दुष्काळ परिषद, महापूर अशा अनेक संवेदनशील विषयांना तिने या काळात न्याय दिला आहे. kay sangshil dnyanada memes

ज्ञानदा कदम – मुख्य वृत्तनिवेदक – एबीपी माझा

म्हणून ज्ञानदा लोकांना आवडते.. – एनर्जेटिक परफॉर्मन्स, सदैव प्रफुल्लित चेहरा, हटके पण सिम्पल स्टाईल, गोड आवाज, चर्चा हाताळण्याचा पवित्रा, समोरच्यांना बोलतं करण्याचं तिचं कौशल्य, अँकरला शोभणारी परफेक्ट देहबोली, प्रोफेशनला साजेसा मेकअप आणि वेशभूषा या सगळ्याच गोष्टींमुळे ABP माझा चॅनेलचा आवाज आणि चेहरा बनून ज्ञानदा कदम महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. राजीव खांडेकर, उदय निरगुडकर, निखील वागळे, प्रसन्न जोशी, भूषण करंदीकर, अमित चव्हाण ही माध्यम क्षेत्रातील तज्ञ मंडळी असताना आपला निभाव लागेल का? असा विचार न करताच ज्ञानदाने या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलंय. यातील अनेकजण तिला शिक्षकांसमान असतीलही. पण हे सगळं असतानाही ज्ञानदा त्यांना ओव्हरटेक करुन गेलीच ही रियालिटी आहे. पत्रकारितेमध्ये समयसूचकता आणि भान असणं फार गरजेचं आहे असं म्हणतात. ज्ञानदाने ते जाणीवपूर्वक मिळवलंय. इतर महिला पत्रकारांचा विचार केला तर अलका धुपकर हिने पत्रकारितेतील गांभीर्य टिकवून ठेवत ते लोकांपर्यंतही पोहचवलं. आजही ती महत्त्वाच्या विषयांना मुद्रित आणि डिजिटल माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करतेय. ज्ञानदाच्या जोडीने काम करणाऱ्या नम्रता वागळे, हर्षदा स्वकुळ आणि आणखी महिलांच्या कामाचंही कौतुक आहेच. सध्या रिपोर्टिंग करणाऱ्या मनुश्री पाठक आणि हलीमा कुरेशी यासुद्धा शिकतायत, धडपडतायत. पण सध्या टाईम आहे ज्ञानदाचाच. kay sangshil dnyanada memes

प्रसन्न जोशी की ज्ञानदा कदम?

कोरोनाशी लढा सुरु असताना जवळपास महिनाभर घरात बसून काय करायचं? असा प्रश्न लोकांना गंभीर करणारा असला तरी ज्ञानदाने तो गंभीरपणा काहीअंशी कमी केलाय असं म्हणायला हरकत नाही. लोकांना न घाबरवता आहे ती वस्तुस्थिती शांतपणे सांगत ‘गपगुमान घरीच बसा’ असा ज्ञानदाने दिलेला सज्जड आणि प्रेमळ दमही लोकांनी चांगलाच मनावर घेतला आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असं ओरडून ओरडून इलेक्ट्रॉनिक मीडियाची ढासळत चाललेली प्रतिमा ज्ञानदाच्या शांत, संयत आणि समंजस निवेदनाने पुन्हा ताळ्यावर येईल असा विश्वास यानिमित्ताने बाळगता येईल. kay sangshil dnyanada memes

२१ दिवसांच्या संचारबंदीची तरतूद

ज्ञानदाचा सहकारी वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी त्याच्या स्टाईलमध्ये काही घटनांचे अपडेट्स घेण्यासाठी, मत विचारण्यासाठी ज्ञानदाला एक प्रश्न फॉरवर्ड करत असतो..आता लोकही तोच कित्ता गिरवतायत, तोच प्रश्न वारंवार विचारतायत.., तुमच्याही मनात आहे का तोच प्रश्न..काय सांगशील ज्ञानदा..??

लेखिका मानसशास्त्र विषयातील पदवीच्या शेवटच्या वर्गात शिकत असून उत्तम संवादक आहेत. जोडीदाराची विवेकी निवड, वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधान, शालेय जीवनातील लिंगभाव या विषयावर त्या शाळा आणि महाविद्यालयांत संवादशाळा घेतात. त्यांचा संपर्क – 8408877063

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

मोठी बातमी! गोरगरीब जनता, कामगारांसाठी सरकारची १ लाख ७० हजार कोटींची घोषणा

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment