सप्टेंबर महिन्यात LPG घरगुती गॅसचे दर लागू ; पहा काय आहेत गॅसच्या नवीन किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी कोणतेही बदल केले नाही आहेत.

मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. परंतू ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत, काही शहरात किंमती कमी सुद्धा झाल्या आहेत.

काय आहेत नवे दर 

दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. मुंबईमध्ये या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. चेन्नईमध्ये ही किंमत 50 पैशांनी कमी होऊन प्रति सिलेंडर 610 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 14.2 किलो घरगुती गॅसच्या किंमती 50 पैसे प्रति सिलेंडर वाढल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment