खवय्यांनो तयार रहा!! आता ‘या’ ठिकाणी येत आहे ‘मोदी इडली’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती संपूर्ण देशभर आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांच्याच तोंडी पंतप्रधान नरेंद्र मोदींच नाव असत. संपूर्ण देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे वर्ल्ड लीडर्स रेटींगमध्ये घसरण झाली असली, तरी मोदींच्या लोकप्रियतेत ,थोडीही कमी झालेली नाही. आता हेच उद्देशून तामिळनाडूमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाने इडली विकण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मोदी इडली असे नावही या इडलीला देण्यात आले आहे.

तामिळनाडूच्या सेलम शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही इडली विकण्यात येत आहे. मोदी इडलीची विक्री शहरातील जवळपास २५ ते ३० दुकानांमध्ये केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात मोदी इडली विक्रीस संपूर्ण शहरात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांच्या नावावर सेलम शहरात जागोजागी ‘मोदी इडली’ची जाहिरात केली जात आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टर्सचीच चर्चा सुरु आहे. ग्राहकांना मोदी इडलीमध्ये १० रुपयात ४ इडली खाण्यास मिळतील. त्याच बरोबर एका वाटीत सांबार आणि चटणी देखील देण्यात येणार आहे. तसेच १० रुपयात ग्राहकांचे पोट भरेल असा दावा देखील करण्यात येत आहे.

तामिळनाडूतील भाजप नेते महेश यांच्या डोक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर इडली विकण्याची कल्पना  आली. शहरात त्याचे पोस्टर्स झळकावून त्यांनी जाहिरातही केली. सध्या पंतप्रधानांसोबत इडलीचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment