रिलेशनशीप

एकमेकांसाठी असा वेळ काढावा…

Untitled design
Untitled design

 लव्हगुरू | नवरा- बायकोचे नाते हे सर्वात सुंदर नाते असते. हे नाते टिकण्यासाठी, बहरण्यासाठी एकमेकांना वेळ देणे फार गरजेचे आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना वेळ देण्यासाठी आपल्याला वेळच पुरता नाही. पण यामुळे आपले नाते दुरावण्याची श्यक्यता खूप जास्त होते.

आजच्या महागाईच्या काळात पैसे कमावणेही गरजेचे आहे. मात्र त्याच बरोबर ज्यांच्यासाठी आपण पैसे कमावतो त्यांना वेळ देणे तितकेच गरजेचे आहे. सर्वांनाच अगदी खूप वेळ नाही देता येत, पण जो क्षण मिळाला तो आपल्या पार्टनर सोबत घालवा. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो.

बऱ्याच लोकांना वेळ कसा काढायचा हाच प्रश्न पडतो, त्यासाठी काही टिप्स –

१) आठवड्यातून एकदातरी बाहेर जेवायला जा, त्यामुळे बोलायला वेळ मिळेल.
२) रात्री जेवणानंतर दोघांनी एकत्र शतपावली करा.
३) तुमच्या मनात एकमेकांचा विचार आहे हे छोट्या- छोट्या गोष्टीतून जाणवून द्या.
४) स्पेशल दिवशी एकमेकांना सर्प्राइसेस द्या.
५) घरातल्या कामात एकमेकांना मदत करा.
६) कधी वेळ मिळाला तर आपल्या पार्टनरच्या आवडीचा पदार्थ बनवा.
७) सतत वाद घालू नका, कोणताही प्रश्न बोलून सोडविण्याचा प्रयत्न कारे.
८) दिवसातून कमीत- कमी १५-२० मिनिट एकमेकांशी बोला.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares