31 मार्चपूर्वी पॅन-आधारकार्ड लिंक करा, अन्यथा भरावा लागेल दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही अजूनही तुमचा पॅन-आधार लिंक केला नसेल, तर हे काम कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपूर्वी पूर्ण करा. तुमचा पॅन-आधार लिंक नसेल तर आर्थिक व्यवहार आणि इतर व्यवहारांशी संबंधित कामात समस्या तर येतीलच, मात्र त्याबरोबरच दंडही भरावा लागू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पॅन-आधार लिंक करणे हे डिजिटल जगासाठी सर्वात महत्त्वाचे काम आहे.

चुकले तर काय होईल ?
पॅन आणि आधार लिंक न केल्यामुळे 31 मार्चनंतर तुमचे पॅनकार्ड इनव्हॅलिड होईल. अशा परिस्थितीत, तुम्ही असा कोणताही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही ज्यामध्ये पॅन वापरला असेल. 31 मार्चच्या अंतिम मुदतीपर्यंत तुम्ही आधार-पॅन लिंक न केल्यास, आयकर कलम 234H अंतर्गत 1,000 रुपये दंड भरावा लागेल. इतकंच नाही तर पॅन-आधार लिंक करूनही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाही तर आयकर कलम 234F अंतर्गत 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.

यापूर्वी दंडाची तरतूद नव्हती
यापूर्वी पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी दंडाची तरतूद नव्हती. नवीन कायद्यानुसार, तुम्ही पॅन-आधार लिंक केल्याशिवाय बँक खाते उघडू शकत नाही किंवा आयटीआर फाइल करू शकत नाही. इतकेच नाही तर याशिवाय तुम्हाला जास्त टीडीएस भरावा लागेल. आयकर विभागाच्या मागणीनुसार पॅनचा तपशील न दिल्यास कलम 272B अंतर्गत 10 हजारांचा दंड होऊ शकतो.

अंतिम मुदतीनंतरही संधी असेल …
तुमची 31 मार्चची अंतिम मुदत चुकली तरीही तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकाल. मात्र, यासाठी तुम्हाला कलम 234H अंतर्गत विशिष्ट शुल्क किंवा दंड भरावा लागेल. यामध्ये डिफॉल्ट केल्याने तुम्ही गुंतवणुकीशी संबंधित काम करू शकणार नाही आणि शेअर-म्युच्युअल फंडाचे व्यवहारही अडकून पडतील.

सोप्या स्टेप्ससह पॅन आणि आधार लिंक करा
सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या https://incometaxindiaefiling.gov.in/ पोर्टलवर जा.
तुम्ही आधीच रजिस्टर्ड नसाल तर युझर आयडी म्हणून पॅन वापरून रजिस्ट्रेशन करा.
युझर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख सह लॉग इन करा.
नवीन विंडोमध्ये तुमचा पॅन आधारशी लिंक करण्याचा एक पॉप-अप दिसेल, जर तो दिसत नसेल, तर मेन्यू बारमधील प्रोफाइल सेटिंग्जमध्ये जा आणि आधार लिंकवर क्लिक करा.
येथे, पॅनद्वारे आधीच भरलेले डिटेल्स तपासा आणि योग्य असल्यास, आधार क्रमांक एंटर करा आणि आता लिंक बटणावर क्लिक करा.
तुम्हाला पॉप-अपद्वारे आधार-पॅन लिंकिंगची माहिती दिसेल.

Leave a Comment