हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केरळमधील कोची येथील विमानतळावर 302 ग्रॅम सोने पकडले गेले, तेही द्रव स्वरूपात. कोचीच्या कन्नूर विमानतळावर एका व्यक्तीला पकडण्यात आले. त्याने डबल लेयर पॅन्ट घातली होती. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली असून चोरट्यांची ही अनोखी आयडीया पाहून उपस्थितांना धक्का बसला.
कोची विमानतळा एअर इंटेलिजन्स युनिटने सदर आरोपीची तपासणी केली. पहिल्या शोधात काहीही सापडले नाही. पण जेव्हा त्याची नजर डबल लेयर पँटवर गेली तेव्हा त्यानी त्याची तपासणी केली. पँट काढून ती कापली गेली. पँटचे थर वेगळे करताच इंटेलिजन्स युनिटला धक्काच बसला.
Air Intelligence Unit at Kannur airport has seized 302 grams of gold in the form of a very thin paste, concealed within the double-layered pants worn by a passenger: Customs Preventive Unit, Kochi in Kerala pic.twitter.com/XYf3V6TJMz
— ANI (@ANI) August 30, 2021
पँटच्या आत पातळ पेस्टच्या स्वरूपात सोने लपवले होते. जेव्हा संपूर्ण पेस्टचे वजन केले गेले तेव्हा ते 302 ग्रॅम निघाले. कस्टम प्रिव्हेंटिव्ह युनिटनुसार, एअर इंटेलिजन्स युनिटने 302 ग्रॅम सोने एका अत्यंत पातळ पेस्टच्या स्वरूपात जप्त केले आहे. तस्करांनी आधी सोने वितळवले असावे असे सांगितले जात आहे. मग ते पॅटच्या एका थरावर पसरले गेले. त्यानंतर आणखी एक थर घालून पँट शिवली आहे असा अंदाज लावला जात आहे. तस्करांची ही अनोखी पद्धत देखील लपून राहिली नाही.