राज्यात ‘या’ तारखेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणीदारूची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यात दारुविक्री सुरु आहे तिथे रांगेत उभे राहण्यासोबत दारू घरपोचही केली जाईल.

दारूची होम डिलिव्हरी कशी करायची याचे नियोजन वाईन शॉप्सनी करायचे आहे. ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल. तसेच दारु घरपोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैदयकीय चाचणी करून त्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क आणि गॉगल वापरणे बंधनकारक असेल.जे दुकानमालक उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधतील, त्यांनाच परवानगी दिली जाईल. तसंच संबंधित डिलिव्हरी बॉयला विभागाकडून ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यालाच दारूची वाहतूक करता येणार आहे.

यापूर्वी राज्य सरकारने रेड झोनमधील दारुची दुकानेही उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, मुंबई आमि पुण्यासारख्या शहरांमध्ये दारु खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. यावेळी तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले होते. त्यामुळे सरकारने रेड झोनमध्ये अवघ्या काही तासांत पुन्हा कडक निर्बंध लादले गेले होते.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment