औरंगाबाद | येथील आकाशवाणीसमोर साफसफाई करत असताना मनपा कर्मचाऱ्याला प्लास्टिकच्या पिशवीत बंदुकाच्या पंधरा गोळ्या आढळल्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जिन्सी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता जालना रोडवरील आकाशवाणी समोरील संत एकनाथ सोसायटीतील प्लॉट क्रमांक पाच जवळ एका ठिकाणी मनपा कर्मचारी संतोष कचरू चाबुकस्वार साफसफाई करत होते. तेथे त्यांना एका प्लास्टिक पिशवी वेगवेगळ्या प्रकारच्या 15 बंदुकीच्या गोळ्या आढळल्या हा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना माहिती दिली.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 12 बोरचे 2 नग आणि 22 पॉइंटचे 13 नग अशा एकूण पंधरा गोळ्या आढळल्या. त्यानंतर पवार यांच्या तक्रारीवरून विनापरवाना बंदुकीच्या गोळ्या बाळगून जाणीवपूर्वक सार्वजनिक रस्त्यावर टाकून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या प्रकाराची सीसीटीव्हीद्वारे तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.