ओबीसीला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होऊन देणार नाही; जयकुमार गोरेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनाची तयारी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातही भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे नेते आमदार जयकुमार गोरेंनी दिली. तसेच जो पर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होऊन देणार नाही, असा इशारा गोरे यांनी सोमवारी सातारा येथे दिला आहे.

भाजपनेते आमदार यांनी सोमवारी सातारा येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी गोरे म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ४ मार्चला या सरकारने ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा प्रश्नी कोर्टात व्यवस्थितरीत्या मांडला नाही. त्यामुळे कोर्टाने या समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले. याची सर्वस्वी जबाबदारी हि राज्य सरकारची आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने 26 जून रोजी राज्य सरकारविरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकार बहुजन विचारांच्या विरोधात असून छगन भुजबळ यांनी अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि मगच आंदोलन करावे, असे गोरे यांनी म्हंटल आहे.

Leave a Comment