लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय – पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राज्यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं मत मोदी यांनी व्यक्त केले.

https://twitter.com/ANI/status/1384526140417531905

मागिल लाटेतील परिस्थिती वेगळी होती. मागील वेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त सुविधा नव्हत्या. आपल्याकडे पीपीई कीट नव्हत्या, लॅब नव्हत्या. मात्र आज कमी काळात आपण सगळं काही तयार केलं. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पीपीई कीट आहेत. टेस्टींगसुद्धा आपण वाढवत आहोत. आतापर्यंत आपण कोरोनाचा लढा मोठ्या धैर्याने समोर नेला आहे. शिस्त आणि धीर धरुन आपण कोरोना लढा इथपर्यंत आणला आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

… तर लॉकडाऊनचा प्रश्नच येणार नाही

मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी या लढ्यात समोर यावं. युवकांना आपल्या गल्लीत, मोहल्ल्यात तसेच सोसायटीमध्ये कमिटी तयार करुन कोरोना नियम पाळण्यासंबंधी मोहीम राबवावी. असे केल्यास सरकारला करोना हॉटस्पॉट जाहीर करण्याची गरज पडणार नाही. लॉकडाऊनचा तर प्रश्नच येणार नाही असंही मोदी म्हणाले.

देशात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ऑक्सिजनचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी सदर कंपन्यांची मदत घेतली जात आहे. तसेच काही भागांत रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तसेच रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी बेडचं प्रमाण वाढवलं जात आहे. लसीकरणावरही भर दिला जात आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लसीची निर्मिती केली जात आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आज पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला होता. तसेच काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी संवाद साधला होता. देशात लाॅकडाऊनची घोषणा तडकाफडकी घेतली जाणार नाही असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment