पाचगणीत अनधिकृतपणे पर्यटक ठेवल्यास लॉजिंग, हॉटेल व्यावसायिकांवर करणार कारवाई : सतीश पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पावसाळा सुरु झाल्याने पाचगणी परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक फिरण्यासाठी येऊ लागले आहेत. सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पाचगणी या ठिकाणी असलेल्या लॉजिंग, हॉटेल व्यावसायिकांनी अनधिकृतपणे पर्यटकांस ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिला आहे.

पाचगणीत कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच या ठिकाणी कोरोनाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्राची बाजारपेठ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठ कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही बंदच ठेवण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक येथील निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी येत आहेत.

पाचगणी येथे कोरोनाचा वाढत असलेले प्रमाण लक्षात घेत पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी गुरुवारी संवादसाधला यावेळी ते म्हणाले, कोरोनामुळे जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी या तालुक्यात पर्यटनास अद्यापही बंदी घातलेली आहे. त्यांच्या आदेशानुसार आतापर्यंत काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. पर्यटक तसेच हॉटेल व लॉज व्यावसायिकांकडून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल. त्यामुळे शनिवार व रविवारी संचारबंदीचे उल्लंघन कोणी करू नये.

Leave a Comment