सावधान ! मतमोजणी दिवशी उसळू शकतो हिंसाचार ; केंद्राचा राज्याला दक्षतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |देशात ७ हि टप्प्याचे मतदान पश्चिम बंगालचा अफवाद वगळता शांततेत पार पडले. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाला आलेल्या गुप्त अहवालात देशात मतमोजणी दरम्यान आणि निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा हिंसाचार घडवला जाऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षतेचा उपाय म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पश्चिम बंगाल मध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या साम्राज्याला शिकस्त देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पक्ष हिंसाचाराचा मार्ग अवलंबू शकतो. तसेच बिहार मधील काही उमेदवारांनी तर आपण निवडून आलो नाही तर आपण सशस्त्र उठाव करू अशा आशयाच्या धमक्या मतदारसंघात दिल्या आहेत. अशा सर्व केंद्रीय गृहमंत्रालयाने कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश सर्वच राज्यांच्या सरकारांना दिले आहेत.

बिहार मध्ये एका अपक्ष उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन हातात बंदूक काढून लढ्यासाठी तयार असल्याचे म्हणले. तसेच रविवारी आलेल्या एक्सिट पोलने विरोधक चवताळले आहेत. त्यामुळे ते हिंसाचाराला तोंड फोडू शकतात असे बोलले जाते आहे. म्हणून बिहार मध्ये शांतता सुरक्षा राखण्याचे मोठे आव्हान व्यवस्थे पुढे उभा राहिले आहे.

Leave a Comment