स्मृती इराणींनी प्रदर्शित केलेला तो व्हिडीओ खोटा : निवडणूक आयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी ६ मे रोजी पार पडले. या मतदाना दरम्यान राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी बूथ कॅप्चरिंग केल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. मात्र ज्या व्हिडीओच्या आधारे स्मृती इराणी हा  दावा करत आहेत तो व्हिडीओच नकली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.

एक वृद्ध महिला आपल्याला कमळाचे बटन दाबायचे आहे मात्र मतदानाला गेल्यास बळजबरीने आपल्याला कॉंग्रेसच्या चिन्हाचे बटन दाबायला सांगितले असे विधान करणारा व्हिडीओ स्मृती इराणी यांनी आपल्या ट्विटर वरून प्रदर्शित केला होता. आता हा व्हिडीओ नकली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे स्मृती इराणी त्यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसला आयते कोलीत हाती सापडले आहे.

 

अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या विरोधात स्मृती इराणी निवडणूक लढत आहेत. त्याच मतदारसंघात कॉंग्रेसने  बूथ कॅप्चरिंग केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला होता. तशी  त्यांनी रीतसर तक्रार देखील उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाला केली होती. मात्र निवडणूक आयोगाने स्मृती इराणी यांनी प्रदर्शित केलेला व्हिडीओ नकली असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली आहे.

Leave a Comment