मोदींच्या शपथविधी पासून पाकिस्तानला ठेवले दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधीला बिम्सटेक (BIMSTEC) मधील सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर मोदींच्या शपथ विधी पासून पाकिस्तानला दूर ठेवण्यात आले आहे.

२०१४ साली नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. तेव्हा सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना शपथविधीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी मात्र सार्क संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना आमंत्रित नकरता बिम्सटेक (BIMSTEC) नेत्यांना भारताने आमंत्रित केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्या पासून भारत पाकिस्तान संबंध कामालीचे ताणले गेले आहेत. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक देखील केला होता. या हल्ल्याच्या जखमा दोन्ही देशांच्या मनात ताज्या असताना पाकिस्तानला या सोहळ्यासाठी आमंत्रित करणे उचित ठरले नसते म्हणून भारताने या सोहळ्यासाठी पाकिस्तानला आमंत्रित केले नाही.

दरम्यान गुरुवारी ३० मे रोजी सांयकाळी ७ वाजता भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ देणार आहेत. याच वेळी भारत सरकारच्या नव्या मंत्री मंडळाला देखील शपथ दिली जाणर आहे.

या देशाच्या प्रमुखांना आहे शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने BIMSTEC देशातील प्रमुखांना मोदींच्या शपथविधीसाठी बोलवले आहे. यात बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाल आणि भूतान या देशांचा समावेश आहे. याशिवाय मॉरिशसचे पंतप्रधान आणि किर्गिझस्तानच्या राष्ट्रपतींना देखील आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment