… म्हणून ठाकरे सरकारला स्थगिती सरकार नाव पाडलं- नवनीत राणा

नवी दिल्ली । केंद्र सरकारची जी योजना आली, तिला आधी स्थगिती देण्याची परंपराच महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने सुरु केली. त्यांना आम्ही स्थगिती सरकार असं नाव दिलं, असं खासदार नवनीत कौर राणा यांनी लोकसभेत म्हटलं. ठाकरे सरकारने मुंबई मेट्रो आरे कारशेड, बुलेट ट्रेन, ग्राम सडक योजना, मराठवाडा वॉटर ग्रील्ड, सीएम फेलोशिप, मुंबई पुणे हायपर लूप, नगरविकास आणि ग्रामविकासाच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे, असं नवनीत राणांनी सांगितलं.

महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या काळात कृषीसंबंधी अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे एके काळी सिंचनात मागे राहिलेला महाराष्ट्र सूक्ष्म सिंचनात देशात टॉप ५ मध्ये येऊ लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. ही योजना राज्यात यशस्वी झाली. या योजनेमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत ६ लाख प्रकल्प २२ हजार गावांत सुरु झाले. परंतु दुर्दैवाने ठाकरे सरकारने त्याला स्थगिती दिली, असं नवनीत राणा यांनी लोकसभेत सांगितलं.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारच्या चौकशीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या योजनेच्या कथित घोटाळ्याच्या प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाने नियुक्त केलेली समिती सोलापुरात दाखल झाली आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like