रायगडमधून सुनिल तटकरे विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये  २१ हजार मताधिक्याने विजय संपादित केला आहे. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव केला आहे. तब्बल सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या अनंत गीते यांचा पराभव केला आहे.

मागील निवडणुकीत सुनिल तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे. राष्ट्रवादीचा दबदबा कोकण भूमीवर वाढवण्यात सुनिल तटकरे यांना यश मिळाले आहे. तसेच अनंत गीते यांच्या धोरणाला कंटाळून जनतेने यावेळी तटकरे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment