नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन

औरंगाबाद – जिल्ह्यातील शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्‍टरी दोन लाख रुपये तात्काळ मदत मिळावी म्हणून झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी खराब झालेल्या पिकांमध्ये अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले.

जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचेही अतिवृष्टीतील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नुकसान भरपाई होण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी गावातील शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन केले. पावसाने उघडीप देऊन चार दिवस झाले तरी येथील शेतकऱ्यांच्या शेतात अद्याप साचलेलं पाणी तसंच आहे. त्यामुळे या तळ्यात शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन केलं. पिकविमा कंपन्या आणि सरकारकडून पंचनामे होत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके, मनोज शेळके, ललित शेळके, अशोक कुटे, नामदेव शेळके, गणेश शेळके, शिवाजी शेळके, राजू शेळके, दिलीप शेळके, डॉ. राजेंद्र शेळके, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर देशमाने, नंदू शेळके, चंद्रकांत शेळके, महेश शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.