आरटीओ निरीक्षकाच्या मुलाकडून जिल्हाधिकाऱ्यांना अरेरावी ; तरुणाला सिडको पोलिसांनी केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । वाद मिटविण्यासाठी जिल्हाधिकारी गाडीतून बाहेर उतरून तरुणाला संमजविण्यासाठी गेले, असता तरुणाने चक्क जिल्हाधिकारी आणि त्यांचा सोबत असलेल्या अमलदारालाच अरेरावीची भाषा केली. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ च्या सुमारास आंबेडकरनगर भागात घडली. तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शशांक अशोक वाघ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पदवीधर निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमची पाहणी करून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चौव्हान हे चालक, पोलिस अंमलदार यांच्या सह निवासस्थानी जात होते. आंबेडकरनगर चौकात वाहन आणि नागरिकांची गर्दी झाली होती. तेथे आरोपी शशांक हा रिक्षा चालकाशी वाद घालत होता, तो कोणाचेही ऐकत नव्हता. हे पाहून जिल्हाधिकारी स्वतः गाडीतून खाली उतरले. त्यांनी स्वतःचा परिचय देत मी जिल्हाधिकारी असल्याचे शशांकला सांगितले व वाद संपविण्याची विनंती केली. मात्र आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांचा विनंतीला धुडकवत अरेरावीची भाषा केली.

या प्रकरणी इंगळे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. व सिडको पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक केली. शशांक हा उस्मानपुरा भागात एक जिम चालवत असून त्याचे वडील हे श्रीरामपूर येथे आर.टी.ओ.निरीक्षक आहेत. स्वतः अधिकाऱ्यांचा मुलगा असून त्याने जिल्हाधिकाऱ्यांना अरेरावी केल्याने त्याच्या या बेशिस्त वर्तनाची निंदा होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment