LPG ग्राहकांना दिलासा देण्याची केंद्र सरकारची तयारी, नवीन प्लॅन काय आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकार घरगुती LPG सिलेंडरचे वजन कमी करण्याच्या तयारीत आहे. 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची वाहतूक करताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकार त्याचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. यापूर्वी एका सदस्याने सिलेंडर जड असल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता.

महिलांना अडचणी येणार नाहीत
याला उत्तर देताना पुरी म्हणाले की,”महिला आणि मुलींनी जड सिलेंडर स्वत: उचलावे अशी आमची इच्छा नाही ज्यामुळे त्याचे वजन कमी करण्याचा विचार केला जात आहे.” ते पुढे म्हणाले की,”14.2 किलो वजन 5 किलोपर्यंत कमी करण्याचा मार्ग काढू… आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.”

सबसिडीबाबत सरकारची योजना जाणून घ्या
LPG च्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, यादरम्यान ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. होय.. पुन्हा एकदा LPG गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात आहे. या सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येत आहेत. माहितीनुसार, आता LPG गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी म्हणून देण्यात येत आहे.

मात्र, काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सबसिडी मिळत आहे. अशा स्थितीत याबाबत संभ्रम कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या खात्यात सबसिडी दिली जात नसल्याची प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, आता तक्रारी येणे बंद झाले आहे.

अशा प्रकारे तपासा
गॅस सबसिडीचे पैसे तपासण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे आणि दुसरा LPG आयडीद्वारे, जे तुमच्या गॅस पासबुकमध्ये लिहिलेले असते. चला तर मग त्यासाठीची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊयात…

1. सर्वप्रथम तुम्ही http://mylpg.in/ वर जा आणि तेथे LPG Subsidy Online वर क्लिक करा. येथे तुम्हाला तीन LPG सिलेंडर कंपन्यांचे टॅब दिसतील. तुमचा सिलेंडर ज्या कंपनीचा आहे त्यावर क्लिक करा. समजा तुमच्याकडे इंडेन गॅसचा सिलेंडर असेल तर Indane वर क्लिक करा.

2. यानंतर, Complaint पर्याय निवडल्यानंतर, Next बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस उघडेल, ज्यामध्ये तुमचे बँक डिटेल्स असतील. या डिटेल्सवरून सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत की नाही हे समजेल.

Leave a Comment