मुंबईच्या छबीलदास शाळेत स्फोट; 3 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुंबईतील दादर येथील छबीलदास शाळेत ४ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी पहाटे ५च्या सुमारास दादरमधील छबीलदास शाळेतील एलपीजी सिलेंडरचे स्फोट झाले. या सिलिंडर स्फोटाची तीव्रता जास्त होती. या भीषण स्फोटामुळे शाळेचा दुसरा मजला उध्वस्त झाला आहे आणि भिंतींनाही तडे गेले आहेत. याशिवाय काचांचे तुकडे परिसरात विखुरलेले आहेत.

स्फोटामुळे आग लागून या आगीमध्ये छबिलदास शाळेच्या कॅन्टीनमध्ये झोपलेले केटरिंगचे काम करणारे कामगार 1) भरत माधव सिंग जारंग, वय 25 वर्ष, हा जखमी झाला असून 2) जावेद अली मोहम्मद सज्जाद अली, 38 वर्ष, याच्या डोक्याला मार लागला आहे. या सर्वाना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण दुर्घटनेची कसून चौकशी करत आहेत.