Thursday, March 23, 2023

मुंबईच्या कस्तुरबा गांधी रूग्णालयात LPG गॅस गळती, अग्निशामक दल दाखल

- Advertisement -

मुंबई | मुंबई येथील कस्तुरबा रूग्णालयात LPGजी गॅस लिंक झाल्याने तात्काळ अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आज शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गॅस गळतीच्या घटनेमुळे रूग्णालयात एकच धावपळ रूग्णांनी व नातेवाईंकाची  सुरू झाली होती.

दक्षिण मुंबईतील चिंचपोकळी परिसरातील कस्तुरबा रुग्णालयात ही घटना झाल्याची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढलं गेले आहे. गॅसगळती मोठ्या प्रमाणात नसल्याचे माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

कस्तुरबा रूग्णालयात झालेली गॅसगळती मोठी नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून रूग्णालय व्यवस्थापनाने रूग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तर अग्निशामद दलाच्या गाड्या रुग्णालय परिसरात थांबविण्यात आलेल्या आहेत.