LTI करणार क्यूलॉजिक टेक्नॉलॉजीजचे अधिग्रहण, 61 कोटींमध्ये झाला करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक लिमिटेडने (LTI) ने बुधवारी सांगितले की, पुणे-स्थित डिजिटल इंजीनियरिंग आणि आऊटसोर्स प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनी क्यूलॉजिक टेक्नॉलॉजीज घेण्याच्या बंधनकारक करारावर स्वाक्षरी झाली आहे. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, “हे अधिग्रहण 84 लाख डॉलर (सुमारे 61.6 कोटी रुपये) मध्ये केले जाईल.”

LTI ने एका निवेदनात म्हटले आहे की,” क्यूलॉजिकची स्थापना 2010 मध्ये झाली होती आणि कंपनी प्रामुख्याने क्लाउड नेटिव्ह वेब आणि मोबाइल एप्लिकेशन्स विकसित करते आणि भारत तसेच अमेरिकेत आपल्या ग्राहकांसाठी इनोव्हेशन लॅब चालवते.”

कंपनीने म्हटले आहे की,” हे अधिग्रहण डिजिटल इंजीनियरिंग क्षेत्रातील आपली पत अधिक बळकट करेल. निवेदनानुसार, क्यूलॉजिक जागतिक उद्योगांना आधुनिक डिजिटल व्यवसाय तयार करण्यात मदत करते.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment