धक्कादायक ! 5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्या पित्याने केला खून

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील अलीराजपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पित्याने आपल्या मुलाचा कुऱ्हाडीने वार करून खुन केला आहे. या आरोपी वडिलांना मुलाला भूतबाधा झाल्याचा संशय होता. अलीराजपूर जिल्ह्यातील खारखडी गावात एका पित्यानं आपल्या 5 वर्षाच्या मुलाचा खून केला आहे.

आरोपी वडिलाचे नाव दिनेश डावर असे आहे. त्याने चौकशीत सांगितले कि, मुलाचा जन्म झाल्यापासून पत्नीची तब्येत खराब आहे. घरातही वातावरण चांगलं नव्हतं आणि बऱ्याच प्रकारच्या समस्या येत होत्या. यादरम्यान आरोपी वडिलांना जवळच्या गावात राहणारी एक महिला भेटली, जिला आपण आपली गुरुमाता मानतो. तिला या सर्व गोष्टी सांगितल्या. या महिलेने आपल्या मुलाला भूतबाधा झाल्याचं सांगितलं.

यानंतर वडिलांनी आपल्या पोटच्या 5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीनं वार करून त्याचे सात तुकडे केले आणि मृतदेह जमिनीत पुरला. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी वडील दिनेश डावर याला अटक केली. यानंतर आरोपी वडिलांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून महिलेचा शोध सुरू केला आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रद्धा सोनकर यांनी दिली आहे.