मध्य प्रदेशात खासगी कंपनीने लावला शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना; मोदींच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । मोदी सरकारच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं देशातील पहिलंच प्रकरण मध्य प्रदेशात समोर आलंय. खासगी कंपनीनं दिलेले चेक बाऊन्स झाले असून शेतकऱ्यांना तब्बल २ कोटींचा चुना लावत ट्रेडर्स फरार झाल्यानं फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवा प्रश्न उभा राहिलाय. (Fraud with MP Farmers)

मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील एका कंपनीनं जवळपास दोन डझन शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजेच पिकांसाठी करार म्हणजेच केला होता. (Contract Farming Fraud) परंतु, वेळ आली तेव्हा मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता ही कंपनीच आता गायब झालीय. दोन डझन शेतकऱ्यांनी मसूर-चनाच्या पिकांसाठी जवळपास २ कोटी रुपयांचा करार केला होता. ‘खोजा ट्रेडर्स’चे मालक असलेल्या दोन भावांनी शेतकऱ्यांकडून उत्पादन घेतलं मात्र कंपनीकडून देण्यात आलेले चेक बाऊन्स झाले. (Modi Government Farm Law)

गेल्या महिन्याभरापासून देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. कॉर्पोरेट आणि बड्या ट्रेडिंग कंपन्यांच्या लाभासाठी हे कृषी कायदे आणले गेल्याची शंका शेतकरी उपस्थित करत आहेत. अशा वेळी मध्यप्रदेशातील ही घटना शेतकऱ्यांच्या शंकेला बरोबर ठरवणारी आहे. कमालीची बाब म्हणजे केंद्रातील मोदी सरकारकडून संसदेत विरोधकांचा विरोध डावलत योग्य चर्चेशिवाय लागू करण्यात आला. मात्र, मध्यप्रदेशात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये झालेली शेतकऱ्यांची फसवणूक मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment