स्वतःच्याच लग्नात नवरदेवाचा वहिनीवर बलात्कार, नणंदेने दिली आरोपीला साथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात आपल्या वहिनीवर बलात्कार केला आहे. पीडित विवाहिता आपल्या मामे सासऱ्यांच्या मुलाच्या लग्नाला आली होती. यावेळी नवरदेवाच्या बहिणीने म्हणजेच पीडित महिलेच्या नणंदेने तिला एका खोलीत बंद केले. यानंतर नवरदेवाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हि घटना ८ जुलै रोजी घडली आहे.

आरोपी नवरदेवाने पीडिताला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. सांवेर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या बहिणीलाही अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आरोपी अनिल हा आपला मामेदीर असल्याचं पीडितेने सांगितलं आहे. आरोपीने तीन वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
अनिलच्या लग्नासाठी पीडिता सांवेरला गेली होती. त्यावेळी तिच्या नणंदेने तिला एका खोलीत नेलं आणि दरवाजा बंद केला. आरोपी नवरदेव त्यावेळी हाताला मेहंदी लावून बसला होता. आणि त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता.त्यानंतर नणंदेने तिला जमिनीवर ढकलून पकडलं, तर नवरदेवाने तिच्यावर बलात्कार केला. घरात लग्नकार्य असल्यामुळे पीडितेने याची वाच्यता कुठेही केली नाही. मात्र लग्नानंतर पुन्हा एकदा नणंदेने तिला जवळच्या एका घरात जबरदस्ती नेलं, तिथेही आरोपी अनिलने तिच्यावर बलात्कार केला. लग्नाहून घरी परत आल्यानंतर विवाहितेची तब्येत बिघडली होती. यानंतर या महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या पतीला दिली. त्यानंतर दोघांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment