हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maha Metro Recruitment 2025 । रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवकांना सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने १५१ विविध पदांसासाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, विभाग अभियंता, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, मुख्य नियंत्रक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक सारख्या विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी ४ जुलै २०२५ पूर्वी mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे? किती रुपये पगार मिळेल? याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
कोणत्या पदासाठी किती जागांची भरती? Maha Metro Recruitment 2025
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०६ जागा
अतिरिक्त महाव्यवस्थापक – ०१ जागा
सहभागी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक- ०१ जागा
विभाग अभियंता – ६१ जागा
उपप्रमुख प्रकल्प व्यवस्थापक- १२ जागा
मुख्य नियंत्रक – ०२ जागा
उपमहाव्यवस्थापक – ०५ जागा
व्यवस्थापक – १४ जागा
सहाय्यक व्यवस्थापक – ४९ जागा
पात्रता काय असावी?
उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित विषयांमध्ये बी.ई./बी.टेक, बी.आर्क, सीए किंवा आयसीडब्ल्यूए पदवी असणे आवश्यक आहे. Maha Metro Recruitment 2025
वयोमर्यादा –
अर्जदारांची कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे असावी.
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक: ५५ वर्षांपर्यंत
अतिरिक्त महाव्यवस्थापक: ५३ वर्षांपर्यंत
सहभागी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक: ५० वर्षांपर्यंत
विभाग अभियंता: ३२ वर्षांपर्यंत
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक: ४५ वर्षांपर्यंत
मुख्य नियंत्रक: ३२ वर्षांपर्यंत
उपमहाव्यवस्थापक: ४५ वर्षांपर्यंत
व्यवस्थापक: ४० वर्षांपर्यंत
सहाय्यक व्यवस्थापक: ३५ वर्षांपर्यंत
अर्ज फी-
इतर सर्व उमेदवार ४००/- रुपये
SC/ST आणि महिला उमेदवार १००/- रुपये
पगार किती मिळेल?
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – १,२०,००० – २,८०,००० रुपये
अतिरिक्त महाव्यवस्थापक- १,००,००० – २,६०,००० रुपये
सहायक मुख्य प्रकल्प व्यवस्थापक- ९०,००० – २,४०,००० रुपये
विभाग अभियंता- ४०,००० – १,२५,००० रुपये
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक- ७०,००० – २,००,००० रुपये
मुख्य नियंत्रक- ४६,००० – १,४५,००० रुपये
उपमहाव्यवस्थापक – ७०,००० – २,००,००० रुपये
व्यवस्थापक – ६०,००० – १,८०,००० रुपये
सहाय्यक व्यवस्थापक – ५०,००० – १,६०,००० रुपये
अर्ज कसा करावा?
अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांनी ४ जुलै २०२५ पूर्वी mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा (Maha Metro Recruitment 2025) आहे. मात्र यानंतर, अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ती संबंधित कार्यालयात पाठवणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया थोडी पारंपरिक असली, तरी दस्तऐवज पडताळणीच्या दृष्टीने आवश्यक आहे.