राज्यसभा बिनविरोध केल्यास विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार; ‘मविआ’चा फडणवीसांना प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशात राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महा विकास आघाडीकडून आता भाजपला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. मविआच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महा विकास आघाडीने राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव फडणवीसांना देण्यात आला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भाजप राज्यसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम राहिली आहे.

आज महा विकास आघाडीतील शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. शिष्टमंडळ व फडणवीस यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी शिष्ट मंडळाने भाजपने आपल्या राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, असा प्रस्ताव फडणवीसांना दिला. मात्र, भाजपकडून तो नाकारण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेच्या तिसऱ्या उमेदवाराबाबत ठाम असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

भाजपकडून तिस-या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाली असल्याचे भाजप नेत्यांकडून नुकतेच स्पष्ट करण्यात आले. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment