दरोडेखोरांची दरोडा घालायची सवय तशीच चालू ठेवणार का? अफजल सुतारांचा महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी विद्यमान प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. महाबळेश्वर शहराने कोरोना विरोधात राबवलेल्या उपाययोजनेत नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी भरमसाठ गैरकारभार केल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी केला आहे. एखाद्या चोराची दरोडे घालण्याची प्रथा आहे म्हणून ती टिकवण्याकरीता त्याला दरोडे घालू द्यायचे नसतात अशी जहरी टीका करत अफजल सुतार नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला आहे.

महाबळेश्वर शहरातील कोरोना वाढीच्या काळात नगराध्यक्षा कोठे होत्या याचं आत्मचिंतन त्यांनी करावं अशी मागणी आता जनतेमधून होत असल्याचं सुतार यांनी सांगितलं. महाबळेश्वर नगरपालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात साताऱ्याचे जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. महाबळेश्वर नगरीच्या सुज्ञ जनतेने आम्हाला नगरसेवक पदाची जबाबदारी दिलेली आहे. कोरोनासारख्या महामारीत प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या लोकहिताच्या निर्णयात आम्ही कधीही राजकारण केले नाही. जनतेवर दु:खाचं सावट असताना लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक काम करणं गरजेचं आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेत सभेच्या ठरावात सोयीनुसार बदल केला जातो. ग्रामीण रुग्णालयातून आॅक्सिजन व बेडच्या आॅपरेटींग करता तज्ञ डाॅक्टरांची नेमणुक व्हावी यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा सुरु असल्याचंही सुतार पुढे बोलताना म्हणाले.

आम्ही डाॅक्टरांची नेमणूक व्हावी म्हणुन प्रयत्नशील असताना नगराध्यक्ष मात्र नवीन बेड आणण्याच्या विचारात असल्याचं सुतार यांनी बोलून दाखवलं. दरम्यान हॅलो महाराष्ट्रने महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेत कोरोनाच्या औषधांमध्ये झालेल्या गैरकारभाराची पोलखोल केल्यांनतर, महाबळेश्वरचं राजकीय वातावरण चांगलच पेटलं आहे. नगरपालिकेत झालेल्या चर्चेवेळी नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी आपला सहभाग नोंदवला.

Leave a Comment