Tuesday, June 6, 2023

उद्यापासून पर्यटनासाठी महाबळेश्वर, पाचगणी पर्यटन पॅाईंट खुले होणार : आ मकरंद पाटील

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

गत काही दिवसापासुन महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटनाकरीता कोव्हीड 19 या साथरोगामध्ये बंद ठेवण्यात आले होते. पर्यटनवर अवलंबून असणाऱ्या पाचगणी व महाबळेश्वर मधील घोडे व्यवसायिक, छोटे स्टॅालधारक याच्यासह हॅाटेल व्यवसायिक हवालदिल झाले होते. महाबळेश्वर तालुक्यांतील विविध संघटना, पक्षांनी पर्यटन पॅाईंट सुरु करण्याकरीता जिल्हाधिकारी सातारा शेखरसिंह याच्याकडे मागणी केली होती. आमदार मकरंद पाटील यांनी पर्यटन सुरु करण्याकरीता कायम पाठपुरावा ठेवला होता. उद्यापासून महाबळेश्वर व पाचगणी येथील सर्व पर्यटन पॅाईंट पर्यटणाकरीता खुले होणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथे हिरडा नाका येथे आयोजीत महत्वपुर्ण बैठकीत केली.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखरसिंह, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. आ. मकरंद पाटील म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यांतील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची रोजीरोटी ही पर्यटनावर अवंलबून आहे. कोव्हीड 19 साथ रोगामध्ये महाराष्ट्राच नंदनवन कोलमडून पडले आहे. पर्यटकांना कोव्हीड 19 संसर्गजन्य साथ रोगामध्ये खबरदारी घेत पर्यटकांसाठी पर्यटन पाॅईट सुरु होणार असल्याची महत्वुर्ण घोषणा यावेळी आ. मंकरंद पाटील यांनी केली.

दरम्यान महाबळेश्वर व पाचगणी येथील पर्यटक पूरक व्यवसाय कर्जाच्या बोजाखाली अडकले आहेत. याबाबत देखील महाविकास आघाडी सरकारने सकात्मक पाऊल उचलावीत अशी मागणी हाॅकर्स, घोडा व्यवसायिक, टॅक्सी व्यावसायिक यांनी केली आहे. जगावर कोसळलेले संकट पर्यटन स्थळातील सर्वसामान्य जनतेला मेटाकुटीला आणले गेले आहे. महाराष्ट्राच नंदनवन पुन्हा पर्यटकाकरीता सुरु होणार असल्याची महत्वाची घोषणा पर्यटनवाढीने महाबळेश्वरला सुखकारक ठरेल.