ऑक्सिजनअभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्र सरकारने माहिती दिलीच नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तसंच, मोठ्या प्रमाणात मृत्यूही झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज संसदेत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी १९ राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले की नाही याची माहिती दिली असून उर्वरित राज्यांनी माहिती दिलेली नाही असे म्हंटल आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र सरकारने देखील ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले की नाही याची माहिती दिलेली नाही असे त्यांनी म्हंटल आहे.

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? असा प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना मनसूख मांडवीय म्हणाले की, आम्ही राज्यांना ॲाक्सिजन अभावी कितीजण दगावले असल्याची माहिती मागवली होती. पण, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले.

देशातील अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण दीव, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम त्रिपुरा, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी याबाबत माहिती दिली.

You might also like