महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक- एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यापासून देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन हा कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण आहे. राज्यातील कोरोनाचा नवीन स्ट्रेन यवतमाळ, अकोला आणि विदर्भातील काही भागात आढळून आला आहे. मात्र, महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचं मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केल आहे.

या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं आणखी कठीण असल्यांचं ते म्हणाले आहेत. तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्याताही डॉ. गुलेरीया यांनी व्यक्त केली आहे. कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेन विरोधात पुर्णपणे प्रभावी नाही. मात्र, करोना लसीकरणामुळे नव्या स्ट्रेनच्या प्रसारावर काही प्रमाणात रोख लावता येईल,असंही ते म्हणाले आहेत. माहितीनुसार भारताता आतापर्यंत कोरोनाचे 240 नवीन स्ट्रेन आढळले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यासा सुरुवात करण्यात आली असून उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment