पुणे | अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्य क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेल्यांना पुरस्कार दिले जातात. २०१८ या वर्षीचे साहित्यातील चार व समाजकार्यातील चार असे एकूण आठ पुरस्कार नुकतेच जाहिर झाले असून साहित्य जीवनगौरव पुरस्काराठी शांता गोखले तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी आनंदवन (वरोरा) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच समाजकार्य प्रबोधन पुरस्कार हरी नरके (पुणे) यांना जाहिर झाला आहे.
शांता गोखले यांनी मराठीत व इंग्रजीत स्वतंत्र्यपणे लेखन केले आहे. त्यांच्या इंग्रजी लेखनामुळे व अनुवादांमुळे राष्ट्रीय स्तरावर व अन्य भाषकांमध्ये मराठी साहित्य पोहोचवण्यात मोलाची भर पडली आहे. तसेच बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या व विकास आमटे यांनी वाढवलेल्या आनंदवन या संस्थेने केलेले कल्याणकारी काम महत्वाचे आहेच, पण ही संस्था गेली ७० वर्षं ऊर्जास्रोत म्हणून महाराष्ट्रातील तरुणाईला उपलब्ध राहिली आहे. या गोष्टींचा विचार सदरील पुरस्कार देताना प्रामुख्याने करण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र फौन्डेशनच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसारीत करण्यात आली आहे.
दरम्यान साहित्यातील वाड्मय पुरस्कार सानिया ( बंगलोर) यांना ‘कथा’ लेखनासाठी जाहीर झाला आहे. सानिया यांच्या कथांची डझनभराहून अधिक पुस्तके आली आहेत, त्यातून त्यांनी स्त्रियांचे विविधतापूर्ण भावविश्व रेखाटले आहे. समाजकार्य प्रबोधन पुरस्कार हरी नरके (पुणे) यांना जाहीर झाला आहे. हरी नरके यांनी शेकडो लेख व हजारो भाषणे याद्वारे केलेले प्रबोधन आणि फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि संविधान या चार विषयांवर केलेले लेखन व संपादन यांचा विचार त्यांची निवड प्रबोधन पुरस्कारासाठी करताना झाला आहे. साहित्यातील ललित ग्रंथ (कादंबरी) पुरस्कार प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना जाहीर झाला आहे. प्रवीण बांदेकर यांनी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीत आशय व विषय यांचे जे नावीन्य आणले. समाजकार्यतील कार्यकर्ता पुरस्कार निशा शिवूरकर(संगमनेर) यांना जाहीर झाला आहे. निशा शिवूरकर यांनी विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या हक्कासाठी केलेले संघर्ष विचारात घेऊन त्यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजकार्यतील कार्यकर्ता पुरस्कार मतीन भोसले (अमरावती) यांना जाहीर झाला आहे. मतीन भोसले यांनी पारधी मुलांच्या शिक्षणासाठी केलेले संघर्ष विचारात घेऊन त्यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यातील रा.शं.दातार नाट्यपुरस्कार राजीव नाईक (मुंबई) यांना जाहीर झाला आहे.राजीव नाईक यांनी त्यांच्या नाट्यलेखनात आशय व विषय यांचे जे नावीन्य आणले,त्याचा विचार प्रामुख्याने केला आहे.
पुरस्कारांचा वितरण समारंभ २७ जानेवारी २०१९ रोजी,पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या पुरस्कारांचे संयोजन केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि साधना ट्रस्ट यांनी केले आहे.
पुरस्कार आणि पुरस्कारर्थींची नावे खालीलप्रमाणे –
साहित्य जीवनगौरव पुरस्कार – शांता गोखले (मुंबई)
समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार – आनंदवन (वरोरा)
साहित्यातील वाड्मय पुरस्कार – सानिया ( बंगलोर)
समाजकार्य प्रबोधन पुरस्कार – हरी नरके (पुणे)
साहित्यातील ललित ग्रंथ (कादंबरी) पुरस्कार – प्रवीण बांदेकर (सावंतवाडी)
समाजकार्यतील कार्यकर्ता पुरस्कार – निशा शिवूरकर (संगमनेर)
समाजकार्यतील कार्यकर्ता पुरस्कार – मतीन भोसले (अमरावती)
साहित्यातील रा.शं.दातार नाट्यपुरस्कार – राजीव नाईक (मुंबई)
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
बाबा आमटे – एका ध्येयवेड्याचा प्रेरणादायी जीवणप्रवास
“नथुरामां”ची भरती कशी होते”? – थर्ड अँगल
अभिनंदन.