कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान होणार- गृहमंत्री अनिल देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभावलं आहे. त्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पदक देवून त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची तुलना थेट लष्कराच्या जवानांसोबत केली आहे.

आपले जवान चीनच्या सीमेवर शौर्य दाखवत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिसही कोरोनाची ही लढाई लढत आहेत असं अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर, या लढाईत अगदी ग्रामीण पातळीपर्यंत पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभावलं आहे. त्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पदक देवून त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच आहेत. त्यामुळं त्याचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. याचसोबत पोलिसांमधील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment