कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी राज्य सरकारनं जारी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं गंभीर स्थिती निर्माण झाली असून, गर्दी व सोशल डिस्टन्सिगच्या नियमांमुळे सण उत्सवांच्या आनंदावर विरजण पडले आहे.दरम्यान, राज्य सरकारनं नागरिकांना सण-उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, बकरी ईद सणासाठी राज्य सरकारनं खालील मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहेत.

१) कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

२) सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.

३) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

४) प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

५) बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

६)कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”