दिलासादायक! राज्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये घट; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. आठवड्याच्या संख्येच्या आधारावर गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये ७ टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. आरोग्य विभागाच्या आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

सध्या देशातील 5 राज्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या अधिक असल्याचंही राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं. त्यापैकी तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून एकूण अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या ६२ टक्के केसेस आहेत. तसंच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या ७० टक्के मृत्यू झाल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.

आंध्र प्रदेशातही अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये आठवड्याच्या आधारावर १३.७ टक्क्यांची घट झाली आहे. तर कर्नाटकमध्ये १६. तामिळनाडूत २३.९ तर उत्तर प्रदेशात १७.१ टक्क्यांची घट झाल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कर्नाटक आणि दिल्लीत आठवड्याला होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत ५० टक्के तर कर्नाटकाच ९.६ टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं. तर महाराष्ट्रात मृत्यू दरात ११.५ टक्क्यांची तर तामिळनाडूमध्ये १८.२ आणि आंध्र प्रदेशात ४.५ टक्क्यांची घट झाल्याचे प्रशांत भूषण म्हणाले. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्याही वाढून २९ लाख ७० हजारांवर पोहोचली असल्याचे राजेश भूषण म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment