शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुस्ती क्रीडा प्रकारातील मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी 2022 कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील या मल्लानं बाजी मारली. दरम्यान सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील याचा सत्कार करण्यात येणार होता, मात्र, सिल्व्हर ओक वरील झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवार सातारा या ठिकाणी येऊ शकले नाहीत. आज पैलवान पृथ्वीराज पाटील याने मुंबई येथे खासदार शरद पवार यांची जाऊन भेट घेतली. यावेळी पवार यांच्या हस्ते पाटील याला मानाची गदा देत त्याचासत्कारही करण्यात आला.

महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवल्यानंतर पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज सकाळी मुंबईत येथे सिल्व्हर ओक या ठिकाणी जाऊन खासदार शरद पवार याची भेट घेत आशीर्वाद घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

साताऱ्यात अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजने अखेरच्या 45 सेकंदात सामन्याला कलाटणी दिली. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला. पहिल्या फेरीत बनकरने 4-0 अशी आघाडी घेतली होती. माती व गादी गटाच्या अंतीम रंगलेल्या सामन्यात गादी गटातून पृथ्वीराज पाटील तर माती गटातून विशाल बनकर महाराष्ट्र केसरीचे दावेदार ठरले.राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली.

Leave a Comment