‘महाराष्ट्र केसरी’चा थरार जानेवारी किंवा फेब्रुवारीत? शरद पवार करतायत पाठपुरावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । सध्या कोरोना महामारिमुळे सर्व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बंद असताना कुस्तीपटूंसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. कुस्ती क्षेत्रातील मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत. स्पर्धा आयोजनाबाबत शासनाची परवानगी मिळावी, यासाठी परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारी २०२१ ला स्पर्धा होतील असे संकेत आहेत.

कोरोनामुळं बंद असलेल्या सर्व राज्यस्तरीय स्पर्धा पूर्ववत सुरू करण्यासाठी महासंघ आणि परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासनाने अनुकुलता दर्शवली तर त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्पर्धा घेण्यासाठी परिषद तयार आहे. ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा. यासाठी परिषदने भारतीय कुस्ती महासंघाचे माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. यासाठी महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषणसिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे पत्रकात सांगितले आहे.

ऑनलाईन स्पर्धा प्रवेशिका
परिषदेची अधिकृत वेबसाईट कार्यन्वित झाली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शहर जिल्हा तालिम संघाने सुचवलेले एक वेबसाईट मॅनेजर दोन सोशल मीडिया प्रतिनिधीची नियुक्ती परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध मैदानासाठी परिषदे मार्फत मोफत अधिकृत पंच
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्ती मैदानांसाठी अधिकृत पंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे मार्फत मोफत देण्यात येतील जेणेकरून पैलवानांना होणारी दुखापत रोखता येईल व भविष्यातील हानी टळेत. तसेच फेसबूक व यूट्यूब पेज वरून हे मैदान मोफत लाईव्ह दाखविण्यात येईल. तसेच परिषदेच्या कायदेशीर बाबीसाठी कुस्ती क्षेत्रातील वकिलांचे कायदेशीर सल्लागार समितीचे पॅनेल गठीत करण्याचा ठराव देखील सर्वानुमते घेण्यात आला. मुलांच्या राज्यस्तरीय अजिक्यपद स्पर्धेप्रमाणे वरिष्ट गट महिला 15,17,20,23 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा देखील प्रायोजकाच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय यावेळी झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment