महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात यावी; दीपाली सय्यद यांची शरद पवारांना विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. मात्र या स्पर्धेत आत्तापर्यंत फक्त पुरुषांनीच सहभाग घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करावी अशी मागणी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

दीपाली सय्यद यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. तसेच त्यांना अधिकृत पत्र पाठवून महिलांसाठी कुस्ती स्पर्धा भरवण्याची विनंती केली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे मार्फत विविध राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात, परंतु पुरूष महाराष्ट्र केसरी प्रमाणे स्वतंत्र महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही याची खंत आहे. असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटल आहे.

महाराष्ट्राला पुरुष महाराष्ट्र केसरी विचारले तर जगजाहीर आहे तसेच जर महिला महाराष्ट्र केसरी कोण ? तरी अद्याप माहीती नाही. आदरणीय साहेब आपणांस विनंती आहे कि पुरुष महाराष्ट्र केसरी प्रमाणे स्वतंत्रपणे महिला महाराष्ट्र केसरीची नविन ओळख महिला कुस्तिगीरांना मिळावी हाच एकमेव उद्देश साध्य व्हावा याचसाठी हे प्रयोजन. आदरणीय पवार साहेब आपण या विषयात मार्गदर्शन करून महिला कुस्तीगीरांना नविन ओळख तुमच्या आशिर्वादाने द्यावी हि नम्र विनंती असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटल आहे.

दरम्यान, आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगत आहे. तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी 900 पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत.

Leave a Comment