राज ठाकरे चौकशीला निघालेत की सत्यनारायनाच्या पुजेला…? एवढं नाटक कशासाठी? – अंजली दमानिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडी ने नोटिस बजवल्यानंतर आज राज चौकशीला सामोरे गेले. याप्रसंगी संपूर्ण परिवार ईडी च्या कार्यालयात त्यांच्या समवेत उपस्थित होता. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे हे चौकशी साठी गेलेत की सत्यनारायनाच्या पुजेसाठी गेलेत..का एवढा ड्रामा.. सगळे मिळून माहिती देणार आहेत की काय..? असे प्रश्न उपस्थित करुन त्यांनी ठाकरे यांच्या वर जोरदार टिका केली.

” राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला ? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण ? सगळे मिळून माहिती देणार का ? काय हा ड्रामा? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न ?” अशा शब्दात त्यांनी राज यांच्या वर टिका केली.

Leave a Comment