नांदेडमधून अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढणार…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नांदेडमधून अशोक चव्हाणांऐवजी त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होती. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षणांनी निवडणूक लढविली नाही तर चुकीचा संदेश जाण्याची भीती हायकमांडला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं जवळपास निश्चित आहे. त्याआधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमदार अमित चव्हाण यांच्या नावाची शिफारस झाली होती, मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला आहे.

नांदेड लोकसभेचा मतदारसंघ हा काँग्रेसचा मजबूत गड मानला जातो. गेल्या महिन्यात राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवतील अशी एक चर्चा सुरु झाली होती. त्यातून काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे, हे कार्यकर्त्यांना दाखऊन द्यायचे होते. नांदेड कॉंग्रेस कमीटीने सुरुवातीला अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव दिल्लीकडे पाठवला. मात्र आता अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

 

इतर महत्वाचे –

गोव्याचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

उद्धव ठाकरेंवर केलेली टीका चांगलीच भोवली… उमेदवारी अडचणीत

नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

Leave a Comment