कोकणताज्या बातम्याराजकीयसिंधूदुर्ग

नारायण राणेंनी निवडणूक लढू नये अन्यथा पराभवाची हॅट्रिक होईल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी | नारायण राणे यांनी मालवण कुडाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हि घोषणा केल्यानंतर त्यांना चुचकारण्याची संधी शिवसेना सोडणार नाही हे मात्र आधीच भाकीत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले होते. त्याच शक्यतेची री ओढण्याचे काम नारायण राणे यांचे कडवट विरोधक आणि राज्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

नारायण राणेंनी निवडणूक लढवण्याचा विचार सोडून द्यावा अन्यथा त्यांच्या कोकणी जनता पराभव केल्या शिवाय राहणार नाही. त्यांच्या पराभव झाल्यास त्यांच्या पराभवाची हॅट्रिक होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. तसेच सिंधुदुर्गात एकदा पराभूत झालेला नेता पुन्हा निवडून येत नाही असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नारायण राणे यांचा मालवण कुडाळ मतदारसंघातून पराभव झाला. तर वांद्रे विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुकीत देखील नारायण राणे यांचा पराभव झाला. दोन वेळा झालेल्या पराभवानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप सोबत लगड केली. त्यानंतर त्यांना राज्यसभेची संधी देण्यात आली.

नारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यांनी राज्याचे सर्वोच्च पद असणारे मुख्यमंत्री पद भुषवले आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा पुन्हा नाद करू नये. त्यांचा पराभव होणे उचित होणार नाही. याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी आणि मालवण कुडाळ येथील आमदार वैभव नाईक हे तरुण तडफदार आमदार आहेत. त्याच प्रमाणे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे राणेंनी निवडणुकीला उभे राहू नये असे दीपक केसरकर यांनी म्हणले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares