विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आजपासून विधिमंडळाचे सहा दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाची सुरवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. अधिवेशनात राज्याचा अंतिरम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयॊग करण्याची शक्यता असून राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच घोषणा केली जाईल, अशी शक्यता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरॊप या मुद्यांवरून अधिवेशनात सरकारची आणि विरोधी पक्षांमध्ये तापण्याची शक्यता आहे. २०१८ पर्यंतच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी पूर्ण करावी अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. २७ फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकल्प मांडला जाईल, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. अधिवेशनात एक दिवस दुष्काळावर चर्चा होणारं आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच मिळेल असे त्यांनी सांगितले.

 

इतर महत्वाचे –

दगडी चाळीतून अरुण गवळीला या अधिकाऱ्याने कॉलर पकडून बाहेर काढलं होतं.

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

माझा तोफखाना तयार आहे आचारसंहिता लागू द्या मग बघा – राज ठाकरे

Leave a Comment